Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांचं टोकाचं पाऊल, संपानंतर बसची पहिली फेरी मारलेल्या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : बीडच्या परळी बस आगारामध्ये गेल्या ३५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. आमचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र, काल या आगारातून बीडला बस सोडण्यात आली होती. या बसची एक फेरी ज्या चालकाने मारली होती, त्या बस चालकाने आज सकाळी परळी आगारात येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नागनाथ गित्ते असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. परळी आगाराचे एसटी कर्मचारी गेल्या ३५ दिवसांपासून कर्मचाऱ्यांना शासनात विलनीकरण करा या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. परंतु, काल पहिल्यांदाच नागनाथ गित्ते हा चालक आणी वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एसटीच्या अधिकारी व पोलrस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती. मात्र, काल एक फेरी मारल्यानंतर आज गित्ते यांनी विष घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, चालक नागनाथ गित्ते यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांनी विष का घेतलं ? हे अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमुळे आणखी वातावरण चिघळल्याचं समोर आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GsgjOD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.