Type Here to Get Search Results !

Thief in Dream City Project: डी. एस. कुलकर्णी यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये चोर शिरला, आणि...

म. टा. प्रतिनिधी, पुणे (DS Kulkarni) यांच्या फुरसुंगी येथील ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये स्टिलची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. ही घटना दोन ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास हडपसरमधील कवटीपाट परिसरातील ड्रीम सिटी इमारतीत घडली. (thief in of at fursungi) क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी २८ वर्षीय सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून तीन चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजा रवी पवार (वय २२, रा. गुजरवस्ती, कवडीपाट), संकेत गायकवाड (वय २२, रा. गुजरवस्ती, कवडीपाट) आणि सुमित साळवे (वय २२, रा. गोसावी वस्ती, कवडीपाट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसके ग्रुपचा फुरसुंगी येथील ड्रिम सिटी हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेकदा चोरीचे प्रयत्न झाले असून, हडपसर पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. या ठिकाणी दोन नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास तिघा आरोपींनी बिल्डिंगमध्ये प्रवेश करून तेथील स्टील चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरांनी तेथे उपस्थित सुपरवायझर शरद कोंडूसकर यांना रॉडचा धाक दाखविला. तर, सुरक्षारक्षक निवृत्ती मोरे यांच्या मानेवर कोयता ठेवला होता. त्यावेळी मोरे यांनी चोरांचा प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी मोरे यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. या प्रकरणी सहायक निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wsZEqJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.