Type Here to Get Search Results !

ऐन दिवाळीत CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश; 'कोविड अद्याप गेला नसून...'

मुंबई: विक्रमी संख्येने दर दिवशी देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची सूचना केली आहे. या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिला डोस १०० टक्के नागरिकांना दिला गेला पाहिजे, हे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवून तसे नियोजन करा, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितले. अद्याप गेलेला नाही, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्त्वाचे आवाहनही केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन महत्त्वाचे ठरले आहे. ( ) वाचा: प्रधानमंत्री हे उद्या (३ नोव्हेंबर) कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना येथून सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. करोना संसर्गाची साथ अजून गेलेली नाही. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टिंगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करून द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहीम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. वाचा: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाइल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनीही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे बैठकीला उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nPTdd5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.