मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेआधी नवाब मलिकांनी (Amruta Fadanvis)यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या एका गाण्याला त्यांनं अर्थसहाय्य पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या त्या आरोपांनंतर त्या गाण्याची चर्चा सुरू आहे. अमृता फडणवीसांनी गायलेले ते गाणे कोणते व नवाब मलिकांचे आरोप याचा घेतलेला सविस्तर आढावा... अमृता फडणवीसांनी गायलेल्या एका गाण्याचा संदर्भ देत नवाब मलिकांना मोठा गौप्यस्फोट केला होता. '' या गण्याला अर्थसहाय्य करणारा व्यक्ती हा जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून तो सध्या कारागृहात आहे. तसंच, जयदीप व देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत, असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. 'अमृता फडणवीस गाणं गातात हे चांगलं आहे. नदीबद्दल गाणं आहे हे ही चांगलं आहे. सोनू निगमला त्यात घेतलं हे ही चांगलं केलं. मुनगंटीवार यांनी अभिनय केला हे सुद्धा चांगलं झालं. गाणं अभिजित जोशींनी लिहिलेलं आहे. मात्र गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे, असं नवाब मलिकांनी म्हटलं होतं. तसंच, नवाब मलिकांनी एक ट्वीट करत गाण्याची माहितीही सोबत जोडली आहे.' त्या ट्वीटमध्ये जयदीप राणाचा उल्लेख फायनान्स हेड असा आहे. वाचाः अमृता फडणवीसांचे ते गाणं कोणतं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासाठी म्युझिकल व्हिडिओद्वारे अवाहन करण्यात आलं होतं. मुंबई रिव्हर अँथम असं या गाण्याचं नावं होतं. तर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि गायक सोनू निगम यांनी पार्श्वगायन केलं होतं. मुंबईतील दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी या चार नद्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ताल धरला होता. या व्हिडिओचा काही भाग वर्षा बंगल्यावर चित्रीत करण्यात आला होता. वाचाः गाण्यावर संमिश्र प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यावर तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी हे चांगले पाऊल उचलण्यात आले आहे, असे काहींचे मत होते. तर, काहींनी यावर टीका केली होतीय देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या करिअरसाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत, असा आरोप त्यावेळेच्या विरोधी पक्षांनी केला होता. सोशल मीडियावरही तेव्हा हा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. पाहा व्हिडिओ
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jUk2Mb