Type Here to Get Search Results !

उरणमध्ये भीषण दुर्घटना; पुलाच्या पिलरचा भाग कोसळून १ ठार, ६ जखमी

रायगड: जिल्ह्यात उरणमधील गावात निर्माणाधीन पुलाच्या पिलरचा काही भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका मजुराला प्राणास मुकावे लागले आहे तर सहा मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Uran Under Construction Bridge ) वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल- मार्गावर जासई गावात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पिलरच्या पियर कॅपमध्ये सीमेंट काँक्रिटचे मिश्रण भरण्याचे काम सुरू असताना तो संपूर्ण भाग खाली कोसळला. त्यात पिलरवर काम करत असलेले मजूरही खाली कोसळले. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा कर्मचारी जखमी झाले. त्या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. दुर्घटनेत मृत्यू पावलेला मजूर आणि जखमी मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याबाबत संबंधित कंत्राटदाराच्या माध्यमातून माहिती घेण्यात येत आहे. वाचा: दुर्घटनेची माहिती मिळताच उरण वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. इतर मजुरांच्या मदतीने मदत व बचाव कार्य करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या साह्याने लोखंडी सांगाडा हटवून रस्ता खुला करण्यात आला आहे. दरम्यान, जासई गावाच्या हद्दीत रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे. जिथे दुर्घटना घडली ते काम या कंत्राटदार कंपनीकडे आहे. या अनुषंगाने आमचा तपास सुरू असून मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना आवश्यक साधनं दिली गेली होती का, याची चौकशी आम्ही करणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pXhRLx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.