मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सर्वात मोठा धक्का बसला आहे. खंडणी वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्रीपद सोडावे लागलेले ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना ईडीने अटक केली आहे. देशमुख यांच्या अटकेआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. ( ) वाचा: समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात वाझेला अटक करण्यात आले व नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्याचदरम्यान, अनिल देशमुख यांनी यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर परमबीर यांनी थेट देशमुख यांना लक्ष्य केले. त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री यांना पत्र लिहित देशमुख हे सचिन वाझे याच्याकरवी खंडणी वसुली करतात. दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट त्यांनी दिले आहे, असा आरोप परमबीर यांनी केला होता. याच प्रकरणात परमबीर यांनी हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाने सीबीआयमार्फत चौकशीचे निर्देश दिले होते. वाचा: देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देशमुख यांच्या मुंबई तसेच नागपूर येथील ठिकाणांवर तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकण्यात आले. देशमुख यांचे स्वीय सहायक आणि स्वीय सचिव यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, ईडीकडून पाचवेळा समन्स बजावण्यात येऊनही देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. ते नॉट रिचेबल होते. त्यातच तक्रारदार परमबीर सिंग हे सुद्धा गायब झाले आहेत. असे असतानाच सोमवारी देशमुख अचानक प्रकटले. देशमुख यांनी एक खुलं पत्र व व्हिडिओ संदेश ट्वीटरवर पोस्ट केला व आपण ईडी कार्यालयात हजर होत असल्याचं जाहीर केलं. 'सत्यमेव जयते' म्हणत मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांनी केला. देशमुख यांची ईडी कार्यालयात तब्बल १२ तास चौकशी चालली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या अटकेचे वृत्त हाती आले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारसाठी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wdmiTF