Type Here to Get Search Results !

धक्कादायक! 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर २ वर्षे सुरू होते अत्याचार

सांगली: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय अतुल पाटील याला अटक केली आहे. इस्लामपूर पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीला अटक केली. इस्लामपूर पोलिसांनी अतुलला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अतुलने तरुणीच्या घरी जाऊन तिला बिर्याणीतून गुंगीचे औषध दिले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर केले. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करत होता, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. बिर्याणीत मिसळले गुंगीचे औषध आरोपी हा तरूणीच्या घरी नेहमी येत-जात होता. ओळखीचा गैरफायदा घेत तो दोन वर्षांपूर्वी तरूणीच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडिता घरात एकटी होती. आरोपीने तिच्यासाठी बिर्याणी आणली. बिर्याणीत गुंगीचे औषध मिसळले होते. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडिओही चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरू होते. अखेर या अत्याचारांना कंटाळून तरुणीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून तिच्या पालकांना धक्काच बसला. पालकांनी जाब विचारल्यानंतर तो त्यांनाही धमकावू लागला, अशी माहिती समोर आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3muvUpV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.