Type Here to Get Search Results !

दुसऱ्या लसमात्रेकडे पाठ?; राज्यातील २१ जिल्ह्यात ३२ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: करोना संसर्ग नियंत्रणात ठेवायचा असेल तर लशीच्या दोन्ही मात्रा घेणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये अद्याप ३२ टक्क्यांहून कमी लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सांगली, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक आहे. मुंबईत ६०.६२ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. तर पुण्यात हे प्रमाण ५१.२७ टक्के, ठाण्यात ३६.९० टक्के, गोंदियामध्ये ४५.८९ टक्के आहे. मात्र सोलापूर, जळगाव, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, नंदुरबार, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, परभणी, अकोला, लातूर, नाशिक, जालना पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, धुळे जिल्ह्यात दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ३२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. सोलापूर, नांदेड, हिंगोली, जळगाव येथे लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या २१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर उस्मानाबाद, नंदुरबार, अमरावती, बुलडाणा अहमदनगर, परभणी येथे हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे. लसीकरण क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आर. एस. पाटील यांनी सांगितले, 'लसीकरणाबाबतची सामान्यांमधील उदासीनता ही संसर्ग पुन्हा वाढण्यास निमंत्रण देऊ शकते. दोन्ही मात्रा घेतल्यानंतर शरीरामध्ये अपेक्षित संख्येने अॅण्टिबॉडीज निर्माण होतात व करोना विरोधात काही दिवसांसाठी संरक्षण देऊ शकतात. त्यामुळे संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला, अशा भ्रमामध्ये कुणीही राहू नये. ग्रामीण भागांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया धीमी आहे, तिथे समुपदेशन, पथनाट्यांद्वारे जागृतीचा प्रयत्न करायला हवा. दुसरी मात्रा न घेण्यामध्ये नेमका कोणता अडसर आहे, हे समजून घेत त्यावर उपाय शोधायला हवा.' राज्यात जूनमध्ये सरासरी दैनंदिन मात्रा देण्याची संख्या ३,३२,१४४ इतकी होती. जुलैमध्ये ३,९१,७१४, ऑगस्टमध्ये ४,६७,२२२, सप्टेंबरमध्ये ७,६०,९५५ तर ऑक्टोबरमध्ये रोज सरासरी ५,३६,७०४ जणांना लसमात्रा देण्यात आली. १८पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी किमान एक मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ७३.७० टक्के होते. तर १८ ते ४४ या वयोगटामध्ये किमान एक मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ६५.२३ टक्के होते. ४५पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीमध्ये एक मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ७७.५० टक्के आहे. जिल्हा एकूण मात्रा टक्केवारी मुंबई : १,४७,३०,२१८ १४.९५ पुणे : १,२१,२७,४४४ १२.३१ ठाणे : ८२,६३,२३६ ८.३९ नाशिक : ४७,९९,६५४ ४.८७ नागपूर : ४४,८१,४८६ ४.५५


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GOk8P8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.