Type Here to Get Search Results !

'पुन्हा गुजरात कनेक्शन'; नवाब मलिकांच्या ट्वीटने खळबळ

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री () यांनी ड्रग्ज प्रकरणात आणखी एक ट्वीट केलं आहे. गुजरात एटीएसच्या (Gujrat ATS) पथकाला १२० किलो ड्रग्ज पकडण्यात यश आलं आहे. यावरुन नवाब मलिक यांनी केवळ दोन ओळींचे ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात नवनवीन खुलासे करत आहेत. एनसीबीनं मुंबईत क्रुझ पार्टीवर टाकलेल्या छाप्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसंच, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. तसंच, गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जबाबतही त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तर, आज पुन्हा एकदा नवाब मलिकांनी गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवर बोट ठेवत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. वाचाः गुजरात एटीएसने मोरबीतील जिंजुडा गावातून ६०० कोटी रुपये किमतीचे १२० किलो हेरोइन जप्त केलं आहे. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या वृत्ताचा आधार घेत नवाब मलिकांनी एक ट्वीट केलं आहे. पुन्हा गुजरात कनेक्शन... उडता गुजरात, असं खोचक ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ngSpiq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.