मुंबई: 'माजी गृहमंत्री हे सोमवारी ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना देखील फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेली तर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी पत्रकार परिषदेत केला. देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार करणारे कुठे आहेत, असे विचारत मलिक यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली. ( ) वाचा: अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर नेते व माजी खासदार यांनी केलेल्या ट्वीटचाही मलिक यांनी समाचार घेतला. भाजपच्या एका नेत्याने ट्वीट केले आहे की, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचाच अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, हे स्पष्ट होते, असे मलिक म्हणाले. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच. मात्र परमबीर सिंग कुठे आहेत?, याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. वाचा: परमबीर सिंग हे महाराष्ट्रातून चंदीगड येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कशी जाऊ शकते? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने त्याला जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यांत भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का?, याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mD4MoJ