Type Here to Get Search Results !

समीर वानखेडे हे नरेंद्र मोदींच्याही पुढं निघून गेलेत; त्यांचे फोटो बघा: नवाब मलिक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी ड्रग्ज प्रकरणात नवनव्या गौप्यस्फोटांची मालिका सुरूच ठेवली असून आज आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक NCB वर दबाव आणत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. तो खोडून काढताना मलिक यांनी आज (Sameer Wankhede) यांच्यावर आणखी धक्कादायक आरोप केले. समीर वानखेडे हे प्राइव्हेट आर्मी चालवत होते. किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, सॅम डिसूझा असे अनेक लोक या प्राइव्हेट आर्मीचे सदस्य आहेत. ही आर्मी निर्दोष लोकांना फसवून हजारो कोटींची वसुली करते. बॉलिवूडमधील कलाकारांकडून अशाच प्रकारे वसुली करण्यात आली आहे. मालदीमध्ये ही वसुली केली गेली आहे. त्यासाठी समीर वानखेडे व त्यांची बहीण यास्मिन वानखेडे स्वत: मालदीवमध्ये गेली होती. समीर वानखेडेला अटक झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट समोर येईल. १८ कोटींच्या वसुलीचे सत्य समोर येईल,' असं मलिक म्हणाले. 'समीर वानखेडे हे इमानदार अधिकारी असल्याचं देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. वानखेडेंचे फोटो बघा. ते नरेंद्र मोदी यांच्याही पुढं निघून गेले आहेत. वानखेडे हे रोज नवनवे कपडे वापरतात. ते ज्या ब्रँडची शर्ट वापरतात, त्यांची किंमत ५० हजारपेक्षा जास्त असेत. ३० हजारांपासून सुरू होणारे टी-शर्ट वापरतात. ७० हजारांची पँट वापरतात. पाच लाखापर्यंतची वेगवेगळी ब्रँडेड घड्याळं वापरतात, अडीच ते तीन-तीन लाख रुपये किंमतीचे बेल्ट वापरतात. एका इमानदार अधिकाऱ्याला हे कसं परवडतं?,' असा खडा सवाल नवाब मलिक यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EGmz4F

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.