सातारा: खासदार () यांनी आज पुन्हा एकदा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या (Satara district bank) पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण?, मी ठरवतो कुठे जायचे ते. माझी जिरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की भले मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका. मेहरबानी करा माझी विंनंती आहे हात जोडून विनंती करतो ही बँक शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहू द्या. त्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. (MP Udayan Raje Bhosale criticized the ruling panel over the elections) खासदार उदयनराजे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हे आवाहन करताना उदयनराजे यांनी मी कोणाचा दुश्मन नाही, असे सांगत एक प्रकारे इशाराच दिल्याचे बोलले जात आहे. अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आली आहे. मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहू द्या. त्यांची जिरवू नका ही मी हात जोडून विनंती करतो, असे आवाहन त्यांनी केले. क्लिक करा आणि वाचा- म्हणून संतापले उदयनराजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपा प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती उदयनराजेंना देण्यास देण्यास नकार दिला. यानंतर खासदार उदयनराजे भोसले भडकले आणि त्यांनी ही बँक बँकच राहूद्या, गोरगरिबांची ती अर्थवाहिनी आहे असे आवाहन त्यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- यावेळी बँकेवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी कळकळीची विनंती करणाऱ्या उदनयराजेंनी अप्रत्यक्षपणे आपल्या नेहमीच्या शैलीत इशाराही दिला आहे. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असेही उदयनराजे पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले या दोन्ही राजांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे.सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये आपला समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच जाब विचारला होता. मात्र, याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे उत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nKznjl