Type Here to Get Search Results !

यंदाच्या दिवाळीत सोनं महाग की स्वस्त? सोनं खरेदी करण्याआधी वाचा मार्केटमधील ट्रेंड

मुंबई : कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, येत्या १२ महिन्यांत सोन्याचा भाव ५२-५३ हजारांपर्यंत पोहोचू शकतो. २०२१ मध्ये आतापर्यंत सोन्याचा ४७ हजार ते ४९००० च्या दरम्यान सतत व्यवहार होत आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींवर नजर टाकल्यास २०१९ मध्ये ५२ टक्के आणि २०२० मध्ये २५ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. IANS मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कमोडिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत सराफाचे दर एकत्र केले तर अमेरिकन डॉलर आणि रोख बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आर्थिक सुधारणांचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला होता. त्यामुळे सोन्याबाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता थंडावली होती. दुसऱ्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे अशा स्थितीत पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढून त्याची किंमत वाढण्यास सुरुवात होईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळीत मागणीत वाढ होण्याची शक्यता दिवाळीनिमित्त शुभ खरेदी म्हणून सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. गेल्या वर्षी दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर देशाच्या कानाकोपऱ्यात निर्बंध होते. यंदा तसे नाही. दुकाने उघडी आहेत आणि निर्बंध नगण्य आहेत. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ७४० टन सोने आयात करण्यात आले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. सोन्याची मागणी ४७ टक्क्यांनी वाढली जागतिक गोल्ड परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत वार्षिक तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मागणी १३९.१० टन इतकी होती. सप्टेंबर २०२० च्या तिमाहीत हा आकडा ९४.६० टन होता. इतकंच नाहीतर दागिन्यांची मागणीही ५८ टक्क्यांनी वाढून ९६.२० टन झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत सोन्याचा दर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात २००० च्या पुढे जाईल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mpNVWh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.