Type Here to Get Search Results !

स्वत:हून 'विकेट' देणार नाही; विरोधकांच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'

मुंबई: 'लूज बॉल आला तर सोडायचा नाही, फटका मारायचाच! तो सोडला तर संधी हुकलीच म्हणून समजा, ही गोष्ट क्रिकेट बघता बघता शिकलो आहे. राजकारणाच्या खेळपट्टीवरही तेच आवश्यक आहे, असं सांगतानाच, 'आपणहून विकेट देणार नाही,' असा 'स्ट्रेट ड्राइव्ह' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हाणला आहे. विरोधकांना हा सूचक इशारा असल्याचं बोललं जात आहे. दिलीप वेंगसरकर स्टँडचं नामकरण, सुनील गावस्कर यांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी बॉक्स तसंच माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियमवर खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. सचिन तेंडुलकर यांनी माधव मंत्री, गावस्कर आणि वेगसरकर यांच्या आठवणींना उजळा दिला. उद्धव ठाकरे यांनी ही संधी साधत यावेळी जोरदार फटकेबाजी केली. वाचा: 'क्रिकेटर व्हावंसं वाटत होतं, पण क्रिकेटर झालो नाही. आम्ही क्रिकेट पाहणारे. क्रिकेट बघता बघता काही गोष्टी शिकता मात्र आल्या. लूज बॉल आला तर फटका मारलाच पाहिजे, तो जर का सोडला तर चान्स हुकला. राजकारणातही तेच लागू होतं. त्यामुळं आपणहून विकेट देणार नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'क्रिकेट कळण्यासाठी ईस्ट स्टँडमध्ये बसावं लागतं, असं पवार साहेब सांगतात, पण आम्हाला क्रिकेट कळू नये म्हणून ते नेहमी व्हीआयपी स्टँडचा पास द्यायचे, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. 'मी ज्या स्टँडमध्ये बसतो तिथून स्विंग आणि स्पिन अचूक कळतात. ते बघत बघत मोठा झाल्यामुळं समोरच्या बॉलरनं टाकलेला स्विंग कोणत्या बाजूनं जाणार आणि स्पिन कोणत्या बाजूनं जाणार हे कळल्यानं इथपर्यंत आलो आहे, असा मिश्किल टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. खेळाडूंचा सन्मान व्हावा: शरद पवार पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवानंतर काही खेळाडूंना समाज माध्यमांवरून लक्ष्य करण्यात आलं, त्याकडं पवार यांनी यावेळी लक्ष वेधलं. खेळाडूंचा सन्मान राखाला जायला हवा. एखादा सामना हरला तर क्रिकेटप्रेमींनी खेळाडूंना नाऊमेद करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mA283f

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.