Type Here to Get Search Results !

अजित पवारांना आणखी एक धक्का! मावसभावाच्या घरी ईडीची धाड

पुणे: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळं नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच, सक्तवसुली संचालनालयानं (ED) पुण्यात धाडी टाकल्या आहेत. उपमुख्यमंत्री () यांचे मावस भाऊ जगदीश कदम (Jagdish Kadam) यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. शुगर्स व जरंडेश्वर साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीनं ही कारवाई केल्याचं समोर येत आहे. अजित पवार यांचे मावस भाऊ असलेले जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या घरी आज सकाळी ईडीचे अधिकारी पोहोचले व झाडाझडती सुरू केली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. जगदीश कदम हे सध्या मुंबईत असून ईडीच्या कारवाईची माहिती मिळताच ते पुण्याला निघाले असल्याचं सूत्रांकडून समजतं. वाचा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही दौंड सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. सोमय्यांच्या आरोपानंतर ७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागानं कारखान्यावर धाड टाकली होती. त्यानंतर आता ईडीनं कारवाई सुरू केली आहे. कारखान्यात कसलीही अनियमितता नसल्याचा खुलासा संचालक मंडळानं याआधीच केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pHW7TZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.