Type Here to Get Search Results !

परमबीर सिंग नेपाळमार्गे 'या' देशात पसार!; निरुपम यांचा मोठा दावा

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर खंडणीवसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांचा शोध घेतला जात असतानाच काँग्रेस नेते व माजी खासदार यांनी मोठा दावा केला आहे. ( ) वाचा: अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप करणारे परमबीर सिंह हे सुद्धा गोत्यात आले आहेत. परमबीर यांच्यावर खंडणीसह विविध गुन्हे दाखल असून ठाणे तसेच मुंबईतील कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट हाती पडताच पोलिसांच्या टीम परमबीर यांचा कसून शोध घेत आहेत. परमबीर यांच्या मुंबईतील घराला टाळे आहे तर आणि रोहतक येथेही ते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परमबीर सिंग यांचे सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सांगत खळबळ उडवून दिली आहे. वाचा: संजय निरुपम यांनी याबाबत आज परमबीर यांच्या फोटोसह ट्वीट केले आहे. 'हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. यांनी मंत्र्यावर हप्तेखोरीचा आरोप केला होता आणि स्वत: पाच प्रकरणांत वॉन्टेड आहेत. पोलीस म्हणताहेत ते फरार आहे. माहिती अशी मिळतेय की ते सध्या बेल्जियमला गेले आहेत. बेल्जियमला ते पोहचलेच कसे? त्यांना सेफ पॅसेज कुणी उपलब्ध करून दिला? आपण त्यांना भारतात आणू शकत नाही का?', असे सवाल निरुपम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केले आहेत. निरुपम यांनी याबाबत खासगी वृत्तवाहिनीकडेही प्रतिक्रिया दिली. त्यात परमबीर सिंग हे हाती लागत नसल्याबद्दल निरुपम यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारलाही सवाल केला. परमबीर हे नेपाळमार्गे येथे गेल्याचा दावा त्यात निरुपम यांनी केला. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस येथून पळून गेलेल्या किरकोळ गुन्ह्यांतील गुन्हेगारांना थेट बिहार आणि उत्तर प्रदेशात जाऊन पकडून आणतात. परमबीर यांच्यावर तर गंभीर गुन्हे दाखल असून सहा महिने ते चंदीगडमध्ये असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही?, असा सवाल निरुपम यांनी विचारला. सीमेवरील सुरक्षा चोख असल्याचा दावा केंद्र सरकार करतं. अलीकडेच सीमेपासून ५० किलोमीटर पर्यंतच्या अंतरात तपासणीची जबाबदारी बीएसएफकडे देण्यात आली आहे. तरीही परमबीर सीमा ओलांडून कसे देशाबाहेर गेले?, असा सवालही निरुपम यांनी विचारला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jVdJIb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.