Type Here to Get Search Results !

नवाब मलिक यांचा धक्कादायक दावा; 'शाहरुखला सांगण्यात येतंय की...'

मुंबई: मुंबई प्रकरणात रोज नव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ही कारवाई बोगस असल्याचा दावा करत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे मंत्री यांनी आज पुन्हा एकदा गंभीर आरोप केला. वानखेडे यांच्याविरुद्ध न बोलण्यासाठी माझ्यावर अनेक मार्गांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगताना मलिक यांनी अभिनेता याचा मुलगा याला कसं अडकवलं गेलं, याबाबतही मोठा दावा केला. ( ) वाचा: क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर मी बोलायला सुरुवात केली तेव्हा परिचयातील अनेक लोकांनी मला थांबवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता थांबा. या प्रकरणात पडू नका, असे ते म्हणाले. त्यांनी शाहरुख खानचा दाखला दिला. शाहरुखला सांगण्यात येत आहे की, तुझ्या बोलण्यामुळे तुझा मुलगा अडकला आहे. त्याला अडकवलं गेलं आहे. तेव्हा तुम्ही (नवाब मलिक) सावध व्हा, असे मला काहींनी सांगितले. पण अशाने मी घाबरणारा नाही आणि मरणाची तर मला अजिबात भीती नाही. जेव्हा यायचं तेव्हा ते येईल, असे मलिक म्हणाले. वाचा: ड्रग्ज प्रकरणात न बोलण्यासाठी किती दबाब आहे, हे सांगताना मलिक यांनी धक्कादायक माहिती दिली. माझा एक मुलगा वकील आहे. काही वकिलांनी त्याचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तोही मला आता पुरे करा, असे सांगत होता. माझ्या दुसऱ्या मुलालाही अशीच भीती घातली गेली. तोही तणावाखाली होता. पण तुम्ही आम्हाला घाबरवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी माझे तोंड कुणी बंद करू शकणार नाही. जे सत्य आहे ते मी सांगत राहणार, असा इशाराच मलिक यांनी दिला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळे उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्याचा मलिक यांनी समाचार घेतला. सोमय्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. ते कशाला, मीच येत्या अधिवेशनात भाजपचा भंडाफोड करणार आहे. महाराष्ट्रात तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, अशी भाजप नेत्यांची अवस्था होईल, असा इशाराच मलिक यांनी दिला. पिक्चर अजून संपलेला नाही. आता पिक्चरचा पुढचा भाग सुरू झाला आहे. आर्यन खान जामिनावर सुटला आहे आणि त्याला ज्याने पकडलं होतं तो आता कोठडीत गेला आहे. आर्यनच्या जामिनाला जो अधिकारी कोर्टात वकिलांमार्फत विरोध करत होता तो घाबरला आहे. स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. या सिनेमाला नक्कीच शेवट आहे आणि मीच हा सिनेमा शेवटापर्यंत नेणार आहे, असे मलिक म्हणाले. कुर्ला येथील जमीन प्रकरणात मुलावर होत असलेला आरोप मलिक यांनी फेटाळला व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w0qki4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.