मुंबई: अध्यक्ष हे करोनामुक्त झाले असून त्यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. राज यांची आई कुंदाताई तसेच बहिणीनेही करोनावर मात केली आहे. याबाबत यांनी माहिती दिली आहे. ( ) वाचा: राज ठाकरे यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे २३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट झाले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाइन होते. दरम्यान, राज यांची आज करोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज यांच्यासोबतच त्यांची आई आणि राज यांची बहीण जयजयवंती देशपांडे यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांनीही करोनावर मात केली आहे. मुख्य म्हणजे राज, त्यांची आई आणि बहीण या तिघांनी करोना प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यानंतरही त्यांना करोनाची लागण झाली होती. राज याचे पुत्र यांना एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही लीलावती रुग्णालयातच उपचार करण्यात आले होते. वाचा: दरम्यान, राज्यात येत्या काळात प्रमुख महापालिकांच्या निवडणुका असल्याने इतर पक्षांप्रमाणे मनसेनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, मुंबई आणि पुण्यातील मनसेचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले होते. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी हे मेळावे होणार होते. राज यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे मेळावे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zz6GNU