मुंबई: प्रकरणातील एक पंच साक्षीदार याने प्रतिज्ञापत्रावर केलेल्या आरोपांमुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक हे आधीच अडचणीत सापडले असताना त्यांच्यांविरुद्ध अॅड. सुधा द्विवेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. अभिनेता याच्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली वानखेडे व अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. ( ) वाचा: सुधा द्विवेदी यांनी मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस स्टेशन तसेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली आहे. आर्यन खान याला सोडण्यासाठी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे व अन्य पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी द्विवेदी यांनी तक्रारीत केली आहे. तक्रारीत , सॅम डिसुझा आणि प्रभाकर साईल यांची नावे असून या सर्वांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, असे सुधा द्विवेदी यांनी नमूद केले आहे. सुधा द्विवेदी यांची तक्रार प्राप्त झाली असल्याचा दुजोरा एका अधिकाऱ्याने दिला. तक्रार प्राप्त झाली असली तरी याबाबत अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेले नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. वाचा: दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाईच बोगस असल्याचा दावा करत मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यातच या प्रकरणात एक पंच साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने रविवारी प्रतिज्ञापत्र जारी करत खळबळ उडवून दिली. आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटींची खंडणी मागण्यात आली. यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते, असा दावा साईल याने केला. या आरोपाची गंभीर दखल घेत एनसीबीने वानखेडे यांची चौकशी सुरू केली असतानाच आता मुंबईत वानखेडे व या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या सर्वांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याने पोलीस कोणते पाऊल उचलतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CldGfZ