Type Here to Get Search Results !

समीर वानखेडेंसाठी 'हा' माणूस करतो वसुली; नवाब मलिक यांनी सांगितलं नाव

मुंबई: ड्रग्ज प्रकरणी होणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अनेक कारवाया बोगस असल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी गेल्या काही दिवसांपासून नवनवे गौप्यस्फोट सुरू केले आहेत. मलिक यांनी आज एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचं पत्र सोशल मीडियात व्हायरल करून खळबळ उडवून दिली आहे. () हे खंडणीखोर अधिकारी असून ते भाजपच्या काही लोकांच्या सांगण्यावरून बॉलिवूडमधून वसुली करतात, असा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला होता. आता एनसीबीच्या अधिकाऱ्याचं हे पत्र मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना दिलं आहे. दिल्ली एनसीबीकडून सध्या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. ती चौकशी करताना या पत्राचाही विचार व्हावा, अशी विनंती मलिक यांनी केली आहे. वाचा: वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा तपशील पत्रात आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडं सोपवण्यात आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून वानखेडे यांना विभागीय संचालक पदी नेमले होते. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिलं गेलं होतं. गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली. त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता. दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलानं है पैसे गोळा केले. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीनं बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो. कार्यालयात त्याचा मुक्त वावर असतो. खंडणी गोळा करून देण्याच्या बदल्यात समीर वानखेडे अयाज खानला बॉलिवूड कलाकारांचं वकीलपत्र मिळवून देतो, असा आरोप मलिक यांनी पत्राच्या आधारे केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30SaVow

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.