मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी आज थेट माजी मुख्यमंत्री () यांच्यावर हल्ला चढवला आहे. मलिक यांच्या आरोपांमुळं भारतीय जनता पक्षाच्या गोटात जोरदार खळबळ उडाली आहे. ' (Neeraj Gunde) हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सचिन वाझे आहे,' असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. वाचा: मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी आज हे गौप्यस्फोट केले. 'भाजपशी संबंधित असलेला नीरज गुंडे हा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. युती सरकारच्या काळात जेव्हा-केव्हा शिवसेना, भाजपचे संबंध तणावपूर्ण व्हायचे. तेव्हा हा गुंडे उद्धव ठाकरे यांना भेटायचा. फडणवीसांचा दूत म्हणून भेटायचा. गुंडे याला फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, निवासस्थानात थेट प्रवेश असायचा. सर्व अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये तो रोखठोक जायचा. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे, कधी होणार, हे तो ठरवायचा. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्याचं नियंत्रण होतं. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची वसुली व्हायची. देवेंद्र फडणवीस जेव्हा-केव्हा नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे, तेव्हा प्रत्यके संध्याकाळी नीरज गुंडे यांच्याच घरी पोहोचायचे. तिथूनच देवेंद्र फडणवीस आपलं 'मायाजाल' फेकायचे,' असं मलिक यांनी सांगितलं. वाचा: राज्यातील सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी व कायदेशीर कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या काळात हाच नीरज गुंडे सर्व यंत्रणांच्या कार्यालयात फिरताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधी वसुल केले जात आहेत. समीर दाऊद वानखेडे यांची बदली करण्यामागेही देवेंद्र फडणवीस आहेत. बोभाटा करून निरपराध नागरिकांना अडकवायचं आणि मुंबई, गोव्यात ड्रग्जचा खेळ सुरू ठेवायचा, यासाठीच समीर वानखेडेला एनसीबीमध्ये आणलं गेलं,' असा आरोपही मलिक यांनी केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jR2CAc