Type Here to Get Search Results !

Maharashtra Rain Live Update: ठाणे, नवी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही पहाटेपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. () मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मुंबई, उपनगर व वसई-विरार भागात वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच आज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांना समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Live Update
  • मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस; रस्ते व लोकल वाहतूक सुरळीत
  • नाशिक: शहरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू, सकाळी साडेआठपर्यंत १३.४ मिलिमीटर पावसाची नोंद
  • नवी मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा
  • ठाण्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात
  • सकाळी १० वाजता समुद्राला मोठी भरती येणार; महापालिका सतर्क
  • वसई- नालासोपारा परिसरात पावसाचा जोर वाढला
  • मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UAKKzQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.