Type Here to Get Search Results !

लोणावळा, खंडाळ्यात ढगफुटी सदृश पाऊस; भल्या पहाटे लोक घराबाहेर

बंडू येवले । अतिवृष्टीमुळे मावळाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. लोणावळा व परिसरात तर ढगफुटी सदृश परिस्थिती होती. लोणावळा खंडाळा व परिसरात अवघ्या तीन तासांतच १७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे. , लोणावळ व खंडाळ्यातील शहर व ग्रामीण भागांतील ओढे, नाले व नदीकाठच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे. घरांमध्ये चार फूटांपर्यंत पाणी साचले आहे. मावळात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत कोसळत होता. पहाटे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील ओढे, नाले व नदीकाठच्या अनेक गावांतील घरांना पुराने वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पाण्यात अडकले. पुराच्या पाण्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पहाटेच लोक घराबाहेर पडले. लोणावळ्यात २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस झाला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पवना धरण ५५.७ टक्के भरले आहे. मावळातील इंद्रायणी, पवना, सुधा, आंद्रा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काही पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. पवना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पवनानगर येथील बाजारपेठेतील घरांत व दुकानात पाणी शिरल्याने नागरिक व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. लोणावळ्यातील खत्रीपार्क, नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली, जुना खंडाळा परिसरासह लोणावळा ग्रामीण परिसरातील कुसगाव बुद्रुक येथील दत्तवाडी येथे ओढ्याच्या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, अनेक वाहने पाण्यात बुडाली होती. तसेच कार्ला, मळवली, वाकसई, बोरज परिसरात इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे हा परिसर पाण्याने वेढलेला आहे. इंद्रायणी नदीवरील वडीवळे, नाणोली येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्यातील टाटाचे लोणावळा धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने टाटा पॉवर्सच्या वतीने लोणावळ्यातील इंद्रायणी नदीच्या काठच्या हुडको कॉलनीसह नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rrK5N9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.