Type Here to Get Search Results !

रायगडमध्ये दरड कोसळल्याने ३० घरे ढिगाऱ्याखाली; ७० जण अडकल्याची भीती

: मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील महाड तालुक्यात असून ३० घरे ढिगाऱ्याखाली आली आहेत. तसंच यामध्ये एकूण ७० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाडमधील बिरवाडीतील ३० घरे ढिगाऱ्याखाली आल्याची प्राथमिक माहिती आहे. या परिसरातील अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची शंका असून पोलिस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. कोकणातील विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी पूल कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता महाडमध्ये तब्बल ३० घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने खळबळ उडाली आहे. महाडमधील दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र पुराच्या पाण्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचवण्यास विलंब होण्याची भीती आहे. सिंधुदुर्गातही वाताहात; पावसामुळे घरांचं नुकसान अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे-गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे-भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी – तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rAMDZG

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.