म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः महामार्गावर पाणी आल्यामुळे गेले चार दिवस बंद असलेला पुणे-बंगळुरू महामार्ग () अखेर सकाळी वाहतुकीला खुला झाला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत आहे. () कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापूर आला होता. यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरसह कोल्हापूर ते सांगली, कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर ते पन्हाळा यासह जिल्ह्यातील ३५ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. महामार्गावर सहा ते सात फुटापेक्षा अधिक पाणी होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून हा मार्ग बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली होती. आज सकाळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतूक सुरू करता येईल का याची पडताळणी केली. त्यानुसार साडेदहा वाजता अवजड वाहने सुरू करण्यास परवानगी मिळाली. पहिल्या टप्प्यात फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सोडण्यात येत असून पेट्रोल-डिझेल, दूध ,पाणी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाचाः जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापुरात येणार होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरू न शकल्याने यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. ते सातारा येथून थेट सांगली जिल्ह्यात जाणार आहेत. जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४८ फुटावर आहे. अजूनही ७५ पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BH61IP