Type Here to Get Search Results !

राज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णांची संख्या सोमवारी ५ हजारांच्या खाली

ामुंबई : राज्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून ५ ते १० हजारांच्या दरम्यान स्थिर झाल्याचं पाहायला मिळत होतं. सोमवारी मात्र ही संख्या ५ हजारांच्या खाली आली असून राज्यात मागील २४ तासांत ४,८७७ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात सोमवारी ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मत्यूदूर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुण्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या किती अ‍ॅक्टिव्ह रुग्ण? सध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५१८ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोणत्या भागात रुग्णांची संख्या जास्त? राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात ७ हजाराहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3749Euk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.