Type Here to Get Search Results !

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन लांबणीवर, कारण...

मुंबई: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन उद्या, २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केले जाणार होते. मात्र, राज्यातील पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. ( Bhumipujan Ceremony) राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी स्वत: ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'कोकणात पावसानं घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळं २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढं ढकलण्यात आलं आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल,' अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. 'दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,' असंही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग, शिवडी आणि नायगाव येथे राज्य सरकारच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळीत ८० रहिवासी गाळे आहेत. या चाळींतील रहिवाशांना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य आणि मालकी हक्कानं देण्यात येणार आहे. याशिवाय, येथील झोपडीधारकांना एसआरए अंतर्गत २६९ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकल्पासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. अलीकडंच जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. वाचा: असा आहे बीडीडी पुनर्विकास प्रकल्प
  • नायगाव येथील चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या ३ हजार ३४४ आहे. येथे पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत बांधण्याचा प्रस्ताव आहे.
  • ना. म. जोशी मार्ग येथील योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या २ हजार ५६० असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.
  • वरळी योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या ९ हजार ६८९ असून पुनर्वसन इमारत ४० मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.
वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zFnVKt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.