Type Here to Get Search Results !

जावेद अख्तर प्रकरणात कंगनाची हायकोर्टात धाव; केली 'ही' विनंती

मुंबई: बॉलीवूडमधील ज्येष्ठ गीतकार यांची बदनामी केल्याच्या आरोपांची दखल घेत अंधेरी न्यायालयाने आपल्याविरुद्ध सुरू केलेली फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही रद्द करून घेण्यासाठी अभिनेत्री हिने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ( Javed Akhtar Vs ) वाचा: न्यायदंडाधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदीचे पालनच केलेले नसल्याने ही कार्यवाही बेकायदा आहे, असा दावा करत कंगनाने केलेला अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे कंगनाने आता हायकोर्टात अर्ज सादर केला आहे. संपूर्ण कायदेशीर कार्यवाही बेकायदा असल्याने ती रद्द करावी किंवा आपल्या या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. कंगनाने अॅड. यांच्यामार्फत हा अर्ज सादर केला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांना दिलेले चौकशीचे आदेश, पोलिसांनी नोंदवलेले जबाब या संपूर्ण प्रक्रियेवरही कंगनाने आपले आक्षेप अर्जात नोंदवले आहेत. वाचा: काय आहे नेमकं प्रकरण? जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावले आणि प्रकरणात माफी मागण्याचा सल्ला दिला. हे सांगताना ते वरच्या आवाजात बोलत होते. त्यामुळे मी घाबरले होते, अशा प्रकारचे विधान कंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तिची बहीण रंगोली हिनेही त्यास दुजोरा दिला होता. याबाबत सोशल मीडियातही पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कंगनाचा हा आरोप फेटाळत जावेद अख्तर यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे. कंगनाने केलेला आरोप तथ्यहीन असून यातून माझी नाहक बदनामी झाली आहे, असे नमूद करत जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याआधारे कंगनाला जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र कंगनाने कोर्टात हजर राहून जामीन मिळवला होता. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rr9Qxp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.