Type Here to Get Search Results !

रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ

दापोली: जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात सेवेत असलेल्या एका अधिपरिचारिकेने दापोली शहरातील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोनी धोंडीराम पवार (वय ३०, मूळ गाव जालना ढोणवाडी ता. परतूर) असे या अधिपरिचारिकेचे नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू करण्यात आला आहे. हिने टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ( ) वाचा: सोनी पवार हिने नायलॉन दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. आज हा धक्कादायक प्रकार घडला. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणाची फिर्याद अधिपरिचारिका हिने दापोली पोलिसांना दिली. वाचा: उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २.३० वाजता सोनी पवार हिची ड्युटी होती. मात्र, ती ड्युटीवर न आल्याने महिला कर्मचारी चौकशीसाठी घरी गेली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. किचनमध्ये तिने फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला होता. याबाबत तात्काळ दापोली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सोनी पवार हिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/371VeuJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.