Type Here to Get Search Results !

जितेंद्र आव्हाड यांच्या 'या' भूमिकेला भाजपचा पाठिंबा!; दरेकर म्हणाले...

ठाणे: धोकादायक दरडी असलेल्या परिसरात शासकीय यंत्रणांना हाताशी धरून बिनधास्तपणे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्यामुळे येथील दुर्घटना घडली असून अशा प्रकारांना तातडीने अटकाव आणण्याची आवश्यकता आहे असे नमूद करत अनिधकृत बांधकाम करणाऱ्या प्रवृत्तींना मोक्का लावण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष यांनी आज केली. ठाणे महानगरपालिकेमध्ये सुमारे २०-२५ वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेने ठाणे येथील विकासकामांना मूठमाती दिल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. ( ) वाचा: प्रवीण दरेकर यांनी आज ठाणे कळवा घोलाईनगर येथील दुर्घटनेतील जखमींची छत्रपती शिवाजी महाराज पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. त्यानंतर रुग्णालयातील अधिष्ठातांशी जखमींच्या उपचाराविषयी चर्चा केली. त्यानंतर दरेकर यांनी ठाणे महापालिका शाळेला भेट देऊन तेथे तात्पुरत्या निवासाला असलेल्या दरडग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे, मृणाल पेंडसे इत्यादी उपस्थित होते. वाचा: दरेकर यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विक्रोळी, चेंबूर, भांडुप या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या घटना का घडल्या, याच्या मुळाशी गेल्यावर असे दिसून येते की, अनधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर होत असून शासकीय यंत्रणेला हाताशी धरून ही कामे केली जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले जात असून जर हे थांबले नाही तर अशा प्रकारच्या आणखीही घटना घडू शकतात. कळवा येथील दुर्घटना ही अतिशय हृदय हेलावणारी आहे. अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. निरागस मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील बाकीचे मृत्युमुखी पडल्याची कल्पनासुद्धा या निष्पाप जीवांना नाही. ही भीषण स्थिती आहे. वाचा: दरेकर यांनी यावेळी गृहनिर्माण मंत्री यांच्या म्हणण्याचे समर्थन केले. अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांवर मोक्का लावा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड हे मंत्री आहेत. गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे आहे तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. या दोघांनी यासाठी पुढाकार घेतला तर भाजपचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी नक्कीच मदतीला येतील, असे दरेकर यांनी सांगितले. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांत महापालिका, प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या दुर्घटना होत आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये २०-२५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे परंतु शिवसेनेने सत्तेच्या काळात ठाणे येथील विकासकामांना मूठमाती दिली असून अनधिकृत बांधकांना पाठीशी घातलं आहे, त्यामुळे आज सरकारच्या बेफिकिरी, निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. वाचा: ठाणे महानगरपालिकेत सत्तेच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एसआरएची संकल्पना आणली, झोपडपट्ट्या वाढू नये यासाठी त्यांनी निर्णय घेतला परंतु तरीही अनधिकृत झोपडपट्ट्यांचे बांधकाम थांबले नाही. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून वनजमिनीची जागा, महसूलची जागा अतिक्रमित करून भूमाफिया अनधिकृतपणे बांधकाम करत आहेत आणि गरीब माणूस स्वस्तात मिळणाऱ्या झोपडपट्टीत राहायला जात आहे आणि त्याला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे, अशी खंतही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. गाडी नव्हे राज्याचा गाडा नीट हाका राज्याची गाडी रूळावर आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांची असून राज्याचा गाडा त्यांनी नीट चालवायला हवा, अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री पंढरपूरपर्यंत स्वत: गाडी चालवत गेले त्याचे एवढं कौतुक होत आहे. परंतु मातोश्री येथून मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्री गाडी चालवून जात नाहीत, यावर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी कार जरूर चालवावी पण त्याआधी ड्रायव्हर सीटवर बसून त्यांनी राज्य व्यवस्थित चालवायला हवं. जनतेला ते अपेक्षित आहे, असेही दरेकर म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iz9CQN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.