Type Here to Get Search Results !

'पॉर्न अ‍ॅप्स आणि वेबसाईटची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा'; भाजप नेत्याची अमित शहांकडे मागणी

मुंबई : 'नुकत्याच झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणींचे शोषण व प्रचंड आर्थिक फसवणुकीची अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी,' अशी मागणी भाजपा नेते आमदार अ‍ॅड यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, 'राज कुंद्रा याच्या कंपनीतर्फे चालवले जाणारे १ अश्लील अ‍ॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडिओ तयार केले गेले होते. अशा ४० हून अधिक बेकायदेशीर अश्लील अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोरवयीन मुलांवर विपरीत परिणाम होत असून नकारात्मकतेने घेरले आहे. चाइल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत २०१९ पासून १५ हजार पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आणि २१३ एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन २०१७ पासून २०१९ पर्यंत पॉस्को प्रकरणात ४५ टक्के वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे.' नक्की काय आहे आशिष शेलार यांची मागणी? 'मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. म्हणून सीबीआय, ईडी, आय अ‍ॅड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशा सर्व अ‍ॅप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत,' अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. 'नागरिकांना अशा सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाइल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडल देण्यात यावी. तसेच सर्व ओटीटीवरील फिल्म, वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा, गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचंही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा,' अशा मागण्या आशिष शेलार यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y4UxwT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.