Type Here to Get Search Results !

राज कुंद्राच्या 'हॉटशॉट'प्रमाणे 'या' ओटीटी अॅपवरही अश्लीलता

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः अश्लील चित्रपट आणि वेब सिरीजचा गोरखधंदा मुंबईपासून देश-विदेशापर्यंत पोहोचला आहे. यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज कुंद्राच्या 'हॉटशॉट'प्रमाणे अनेक ओटीटी सक्रिय असून, 'पॉर्न रॅकेट' चालवणाऱ्यांची आतापर्यंत साडेसात कोटींची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. यासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेसह अन्य ठिकाणी आणखी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेला पॉर्न फिल्मचा गोरखधंदा फेब्रुवारीत उघडकीस आणला. याप्रकरणात सहभागी असलेल्या अभिनेत्री गहना वसिष्ठसह बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली. बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणींना मोठ्या बजेटचे चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये भूमिका देतो सांगून त्यांच्याकडून करारावर स्वाक्षरी करून घेतली जाई. हा करार मोडल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी देऊन तरुणींना भाड्याने घेतलेल्या बंगल्यात नेऊन त्यांच्या अश्लील चित्रफीत तयार केल्या जात. यामध्ये कुंद्राच्या कंपनीचा व्यवस्थापक उमेश कामतला अटक केल्यानंतर हे अश्लील चित्रपट आणि वेब सिरीजचे चित्रीकरण तसेच अर्थपुरवठा कुंद्राकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार कुंद्रा आणि यासाठी तांत्रिक जबाबदारी सांभाळणारा रायन थॉर्प याला सोमवारी अटक करण्यात आली. कुंद्राच्या नातेवाईकाची लंडनमध्ये केनरीन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. कुंद्राने स्वतःच्या आर्म्स प्राइम मीडिया कंपनीमार्फत लंडनमधील या कंपनीला 'हॉटशॉट'वर चित्रफीत अपलोड करण्याची जबाबदारी दिली होती. काही दिवसांनी कुंद्राने या कंपनीतील पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्याच विआन कंपनीच्या वेगवेगळ्या बँकेत असलेल्या खात्यावर परदेशातून कोट्यवधींची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम नेमकी कशी आली याचा तपास पोलिस करीत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅटचा पुरावा कुंद्राने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता आणि त्या माध्यमातून किती व्यवसाय झाला, कोणत्या वेब सिरीज अथवा चित्रपटातून किती फायदा झाला, तसेच कुणाला किती पैसे द्यायचे याबाबतची चर्चा केली जात असे. सुमारे २०० पानांचे चॅट पोलिसांच्या हाती लागले असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची आणि भक्कम पुराव्यांमुळे कुंद्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या ओटीटी ॲपवरही अश्लीलता कुंद्राच्या 'हॉटशॉट' प्रमाणे हॉटहिट, न्यूफिल्क्स ओटीटी ॲपवरही अश्लील फिल्म आणि वेब सिरीज दाखवल्या जात आहेत. देश-विदेशातील लाखो जणांनी हे ॲप डाऊनलोड केले असून, त्यावरून शेकडो अश्लील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Boqan1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.