Type Here to Get Search Results !

करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राची मोठी आघाडी; केली 'ही' विक्रमी कामगिरी

मुंबई: विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस देण्यात आले असून एक कोटीहून अधिक नागरिकांना लसचे दोन्ही डोस देणार हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. लसीकरणात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच सर्वात पुढे राहिलं असून आता विक्रमी टप्पा गाठत राज्याने थक्क करणारी अशी कामगिरी केली आहे. ( ) वाचा: वरील लसचे दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे करोनापासून संरक्षण करण्यात आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विशेष कौतुक केले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. वाचा: लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहेत. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरू असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात आज सुमारे ४ हजार १०० लसीकरण केंद्र सुरू असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांचं खास ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या विक्रमी कामगिरीची स्तुती केली आहे. नैसर्गिक आपत्ती कोसळली असतानाही महाराष्ट्राने लसीकरणात विक्रमी कामगिरी करत १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. या कामगिरीसाठी आमचे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि अन्य अधिकारी यांचे मी अभिनंदन करतो, अशा आशयाचे ट्वीट आदित्य यांनी केले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ryBetj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.