कोल्हापूर: विविध योजना, उपक्रम, निर्णय या माध्यमातून केंद्र सरकार अतिशय चांगली कामगिरी करत आहे. तरीही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून महाविकास आघाडी सरकार केंद्राला बदनाम करत आहे. यामध्ये खासदार आघाडीवर आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी केला. ( ) वाचा: कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, लसीकरण मोहिमेत शंभर कोटींचा टप्पा पार करत केंद्राने करोना रोखण्यासाठी योग्य पावले उचलली. एवढ्या मोठ्या देशात अतिशय नियोजनपूर्वक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तरीही त्याबाबत विविध आरोप केले जात आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून केंद्राला बदनाम केले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. वाचा: तपास यंत्रणेबाबत काही तक्रारी असतील, संशय असेल तर न्यायालयात जावे, उगाच आरोप करत त्या संस्थांची बदनामी करू नका, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. एखादी तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असते. त्यांच्या कामाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा फारसा संबंध येत नाही. काही प्रकरणात न्यायालय जामीन देत नाही. मात्र, त्यावरून एखादा मंत्री केंद्राच्या तपास यंत्रणेवरच टीका करतो. हे कितपत योग्य आहे? अलीकडे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री ही भूमिका पार पाडत आहेत. ते अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाच्या मागे वकिलाप्रमाणे उभे राहिले आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. वाचा: पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते यांनी भाग घेतला आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वय झाले आहे. तरीसुद्धा पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊन ते नगरसेवकांना भेटत आहेत. याचाच अर्थ उपमुख्यमंत्री एकटे पुरेसे ठरत नाहीत.' एसटीची दरवाढ करून सरकारने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडण्याचे काम केल्याचा आरोप करून पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्या परीक्षेत सरकारने मोठा गोंधळ घातला. याबाबत आम्ही तक्रार केली. पण त्याची दखल न घेता आम्ही या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3117iNe