Type Here to Get Search Results !

वानखेडे यांच्यावर कारवाई होईल का?; उज्ज्वल निकम यांनी मांडले महत्त्वाचे मत

नागपूर: प्रकरणात सध्या रोज नवनवीन आरोप होत आहेत. आता एनसीबीचे अधिकारी यांची चौकशी सुरू झाली आहे. तपासा दरम्यान तपास अधिकाऱ्यावरच आरोप झाले तर त्याची चौकशी होणे ही खात्यांतर्गत प्रक्रिया आहे. मात्र याचा अर्थ त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होईलच असे नाही, असे मत ज्येष्ठ वकील यांनी व्यक्त केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून एखादा व्यक्ती ड्रग्सच्या आहारी गेलाच आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही, असेही मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. ( ) वाचा: नागपूर शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीला शहरात आले असता काही पत्रकारांनी त्यांच्याशी मुंबईतील प्रकरण आणि त्याअनुषंगाने सुरू असलेले आरोप प्रत्यारोप या विषयावर संवाद साधला. निकम म्हणाले, ‘एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना तपास अधिकाऱ्यावर आरोप झाल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्याच्या वरिष्ठांना असतो. सहसा साक्षीदाराने हे आरोप केल्यास वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करतात. मात्र म्हणून त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईलच असं नाही. ’ वाचा: न्यायालयाने दखल घ्यावी या प्रकरणात तपासी अधिकारी आणि राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हे योग्य नाही. प्रत्येकाने संयम बाळगायला हवा. तपास अधिकाऱ्यांनीसुद्धा तपास सुरू असताना उठसूट प्रसारमाध्यमांकडे धाव घेणं योग्य नाही. राजकारण्यांनीसुद्धा तपास अधिकाऱ्याच्या हेतुबद्दल प्रश्न निर्माण करत जनतेचे मनात संशय निर्माण करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत न्याय यंत्रणेने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b9wnYd

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.