मुंबईः डब्बा ट्रेडिंगच्या ( ) माध्यमातून हजारो कोटींचा उलाढाल करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली असून याप्रकरणी दलालांना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पार्कसाईट परिसरात हजारो कोटींची सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७च्या युनिटला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घाटकोपर परिसरातल्या इमारतीत छापेमारी केली होती. त्यावेळी ११ व्यक्ती समभागांची खरेदी- विक्रीचे व्यवहार करत असल्याचे आढळून आलं. काळ्या पैशांचे अंगडीया आणि हवाला मार्फत रोखीने व्यवहार झाल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. वाचाः डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून गेल्या ७ महिन्यात साडेसात हजार कोटींच्या समाभागांची खरेदी विक्री केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपीकडून ५ लाख ९० हजार रोख, ४५ मोबाईल, तीन पेनड्राईव्ह, पाच लॅपटॉप, संगणक, सात हार्ड डिस्क, आणि एक नोटा मोजण्याची मशीन हे साहित्य जप्त केले आहे. तर, राजेश पटेल, शैलेश नंदा,दिनेश भानुशाली, महेश कटारिया यांना अटक करण्यात आली आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Gv2Arb