मुंबई: झाल्यानंतर सुरू असलेल्या गोंधळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. आज (३० ऑक्टोबर व उद्या (३१ ऑक्टोबर) रोजी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेणाऱ्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट देण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास रेल्वेने जाहीर केला. ( ) वाचा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या () परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबर रोजी द्यावी, असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. यावर रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. वाचा: राज्य सरकारने केली होती विनंती राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात परीक्षेबाबत तपशील देत मागणी केली होती. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी (एमपीएससी) परीक्षेसाठी प्रवास करणार असून त्यांना ३० व ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे ‘ एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हे ही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी व गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र, याची शहनिशा करून परवानगी द्यावी, असे पत्रात सविस्तरपणे लिहिले होते. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31eA8d7