Type Here to Get Search Results !

भाजप- मनसे युतीसाठी दिल्लीचा दौरा?; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. राज यांच्या कृण्णकुंज या निवासस्थानी उभय नेत्यांमध्ये शुक्रवारी ही बैठक झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युतीच्या चर्चेला बळ मिळालं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील हे दिल्लीला दाखल झाले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी राज ठाकरेंच्या भेटीबाबात चर्चा करणार का?, असा सवाल विचारला असता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि दिल्ली दौऱ्याचा काहीही संबंध नाहीये. राज ठाकरेंच्या भेटीबाबतचा मी पंतप्रधान मोदी व अमित शहांना तपशील देणार आहे. मनसेसोबत युतीची बातचीत अजून प्राथमिक लेव्हलवर आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीचा दौरा हा १५ दिवस आधी ठरला होता. नव्या मंत्र्यांना भेटणे हा उद्देश आहे. महाराष्ट्रासंबंधी प्रश्न नवीन मंत्र्यांसमोर ठेवणार आहे. राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. येत्या सोमवारी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवारदेखील दिल्लीत दाखल होणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय हे नेते उपस्थित आहे. सोमवारी भाजपची दिल्लीत बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37xiAZn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.