Type Here to Get Search Results !

मुंबई लोकलवरील निर्बंध कसे उठणार?; सूत्र ठरलं, 'या' मंत्र्याने दिली माहिती

कोल्हापूर: सर्वांसाठी खुली होणार का? प्रथम फक्त दोन्ही डोस घेणाऱ्यांनाच लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार का? असे अनेक प्रश्न कळीचे बनले असतानाच ग्रामविकास मंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेचा हवाला देत मोठे विधान केले आहे. त्याचवेळी भाजपच्या आंदोलनावरही मुश्रीफ यांनी सडकून टीका केली आहे. ( ) वाचा: मुंबई लोकलमधून सध्या केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. कोविडची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत सर्व प्रवाशांना लोकलची दारे खुली करण्याबाबत राज्य सरकार सावधपणे पावले टाकत आहे. लोकलमधून पुढच्या टप्प्यात नेमकी कुणाला प्रवासमुभा द्यायची, त्यात दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना परवानगी द्यायची तर ते ओळखायचे कसे, गर्दी टाळण्यासाठी काय करायचे, असे विविध प्रश्न सरकारपुढे आहेत. त्यामुळेच व्यवस्थित नियोजन करूनच पुढचा निर्णय सरकार घेईल हे निश्चित आहे. याच अनुषंगाने आज हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. वाचा: लोकल सर्वांसाठी खुली करा म्हटलं म्हणून तसा निर्णय लगेच घेता येत नाही. काहीच नियोजन न करता थेट निर्णय घेतला आणि उद्या रेल्वे स्टेशनांवर गर्दी उसळली तर काय करायचं?, याचाही विचार व्हायला हवा. म्हणून एक अॅप तयार करावं. गर्दीवर नियंत्रण राखता येईल अशा पद्धतीने प्रवासमुभा द्यावी. अशाप्रकारची आखणी सरकार पातळीवर सुरू आहे. लवकरच याला अंतिम रूप मिळेल, अशी अपेक्षा आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झालेली आहे. त्यात दोन्ही डोस ज्यांनी घेतलेत त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असा विचार झालेला आहे. मुंबईचे पालकमंत्री यांनीही तशी माहिती दिलेली आहे. काही तरी सीस्टिम बनवून ही परवानगी दिली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. त्यानुसार पुढची कार्यवाही होत आहे, असे मुश्रीफ यांनी नमूद केले. लोकल प्रवासावरील निर्बंध उठवण्यासाठी भाजपच्या वतीने मुंबईत नियम मोडून आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी पोलीस आणि प्रशासनाची बंदी झुगारून लोकलने प्रवास केला. या संपूर्ण आंदोलनावर मुश्रीफ यांनी तोफ डागली. लोकलबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे लक्षात आल्याने केवळ श्रेय घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून चढाओढ लागली आहे, असे मुश्रीफ म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VxuBMe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.