Type Here to Get Search Results !

ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान; म्हणाल्या...

जळगाव: 'महाविकास आघाडीचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे, हे मी ठामपणे सांगू शकते. राज्याचे मुख्यमंत्री हे फार व्यापक दृष्टीकोन असलेले व मोठ्या मनाचे नेते आहेत. मुख्यमंत्री यांच्यामुळेच सरकार व्यवस्थित व स्थिर चालते आहे आणि चालणार असून पाच वर्षेही पूर्ण करेल', असा विश्वास आज नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यांनी व्यक्त केला. ( ) वाचा: स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस एखादवेळी स्वबळावर लढेल, ते काही चुकीचे नाही. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्रपणे आहोत ही एकच वास्तविकता असल्याचेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७५ वर्षे पूर्ण करत असल्याने काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 'व्यर्थ न हो बलिदान' हा देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मंत्री अॅड. ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्थिर आहे आणि पाच वर्षे स्थिर राहील असे ठामपणे सांगितले. वाचा: केंद्राकडून जर लसीकरणात राजकारण करण्यात आले नसते तर आजपर्यंत देशात ५० टक्केपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झाले असते, असा आरोप यावेळी अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला. आपल्या देशात करोना वरील लशींचे राजकारण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. सध्या देशात केवळ ३० टक्के लोकांचा लसीकरणाचा पहीला डोस पूर्ण झाला आहे. अजून बालकांचे लसीकरण झाले नसल्याने आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने उपायोजना कराव्या लागल्यात. लसीकरणाच्या संथगतीला केंद्र शासन जबाबदार असल्याचे ठाकूर म्हणाल्या. यावेळी शासनाकडून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोविड मुळे पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी देखील शासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील त्यांनी दिला. इतिहास बदलण्याचा घाट देशाचा इतिहास मोडण्याचा प्रयत्न होत आहे. खोट्या गोष्टी छापून त्या खऱ्या असल्याचे सागंण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकपर्यंत देशाचा खरा इतिहास पोहचविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात असल्याची माहीती यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. खेल रत्न पुरस्काराच्या नाम बदलावरुन मंत्री ठाकूर यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली. राजीव गांधी खूप व्यापक व मोठ्या मनाची व्यक्ती होती. ते असते तर त्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले असते. पण, पंतप्रधान किती कुत्सीत मनाचे आहेत ते या ठीकाणी दिसत आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागतच केले आहे पण, वेगळ्याप्रकारे देखील या गोष्टी हाताळता आल्या असत्या असेही त्या म्हणाल्या. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lUwnlx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.