Type Here to Get Search Results !

पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर डॉ. भागवत कराड यांचं महत्त्वाचं ट्वीट; म्हणाले...

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या नव्या मंत्रिमंडळात खासदार ()यांना डावलून त्यांचे समर्थक डॉ. () यांना स्थान मिळाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच दिल्लीला रवाना झाल्यानंतर या चर्चांना अधिक उत आला आहे. त्यातच आता डॉ. भागवत कराड यांनी पंकजा मुंडे ()यांची भेट घेतली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. बीड आणि नगर जिल्ह्यातील समर्थकांनी पदधिकाऱ्यांकडे राजीनामे दिले आहेत. राजीनामा सत्र सुरु झाल्यानंतर पंकजा मुंडे लवकर एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्याआधी डॉ. भागवत कराड यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं अनेक तर्क- वितर्क लढवले जात आहेत. वाचाः भागवत कराड यांनी सोमवारी एक ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाण शुभेच्छा दिल्या, असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे व भागवत कराड यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचं समोर येत आहे. वाचाः मुंडे समर्थकांचे राजीनामास्त्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने निषेध म्हणून बीड जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 'मुंडे परिवारातील सदस्यांना पद देताना स्थान मिळत नसेल, तर आम्हीही पदावर न राहता सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करू,' अशी भूमिका राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या राजीनामास्त्रामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण तापणार असल्याची चिन्हे आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hCkk9T

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.